पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, Covid-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांनी घरूनच त्याच्या अँड्रॉइड मोबाईल फोनचा वापर करून करावी. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडेल.
१) ऑनलाइन रजिस्ट्रेशन (नोंदणी)
२) विषयवार गुणानुक्रम यादी (फक्त विज्ञान वर्गांसाठी)
3) तात्पुरती प्रवेश निश्चिती.
१)ऑनलाइन रजिस्ट्रेशन (नोंदणी):
प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश पूर्व नोंदणी अनिवार्य आहे,त्यासाठी रु १००/-, फी निर्धारित केलेली आहे, फी भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन (नोंदणी) पूर्ण होणार नाही आणि फॉर्म सुद्धा प्रिंट होणार नाही. (नोंदणीसाठी फ्लोचार्ट बघा)
२)विषयवार गुणानुक्रम यादी:
(फक्त विज्ञान वर्गांसाठी)कला व वाणिज्य वर्गांसाठी प्रथम मागणीस प्रथम प्रवेश याप्रमाणे आणि विज्ञान वर्गांसाठी विषयवार गुणानुक्रमे यादी प्रकाशित करून तात्पुरता प्रवेश निश्चित करता येईल.
३)तात्पुरती प्रवेश निश्चिती:
नोंदणी झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची ची पडताळणी करून प्रवेश पात्र (विज्ञान वर्गांसाठी विषयवार गुणानुक्रमे प्रवेश पात्र) विद्यार्थ्यांना तसा एस. एम. एस. (SMS) विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर कॉलेज कडून पाठवण्यात येईल, त्या एसएमएस मध्ये तो घेऊ इच्छित असलेल्या वर्गाची प्रवेश फी व ती भरण्यासाठी एक ऑनलाइन लिंक दिलेली असेल. या लिंक ला क्लिक करून आपण ४८ तासात प्रवेश फी भरून आपला तात्पुरता प्रवेश निश्चित करावा (प्रवेश निश्चितीसाठी फ्लो चार्ट बघा)