पदवी व पदव्युत्तर वर्गांसाठी

 

महाविद्यालयात प्रवेश घेण्याकरिता पुढील प्रमाणे कागदपतत्रे आवश्यक आहेतः

 

महाराष्ट्र राज्य पुणे / नाशिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची १२ वी ची परिक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यानी पुढील कागदपत्रे सादर करावीत.

१) काळ्या बॉल पेनने अचुक माहिती भरलेला छापील नमुनाचा प्रवेश अर्ज.

२) रॅगींग न करण्यासंबंधीचे हमीपत्र (विद्यार्थी व पालकाचे)

३) पासपोर्ट आकाराचे नवीन काढलेले तीन रंगीत फोटो. (समोर पाहून फोटो काढावा)

४) दहावीच्या गुणपत्रकाची फक्त एक झेरॉक्स प्रत.

५) बारावीचे मूळ गुणपत्रक + तीन अटेस्टेड झेरॉक्स प्रती.

६) बारावीची शाळा सोडल्याचा मूळ दाखला + तीन अटेस्टेड झेरॉक्स प्रती.

७) मूळ बोनाफाईड / कॅरेक्टर सर्टिफिकेट + दोन अटेस्टेड झेरॉक्स प्रती.

८) मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जातीच्या दाखल्याची फक्त एक अटेस्टेड झेरॉक्स प्रत.

९) मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची फक्त एक अटेस्टेड झेरॉक्स प्रत.

१०) प्रवेश घेताना भरावयाची संबधित वर्गाच्या शुल्काची आवश्यक रक्कम (फी-तक्त्यानुसार)

११) सवलतीत प्रवेश घेणार्‍या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचा अर्ज करणे अनिवार्य आहे, अन्यथा संपूर्ण फी जमा करावी लागेल.

१२) मान्यता क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश घेण्यास इच्छुक असतील तर मेरिटनुसार प्रथम येणार्‍यास प्राधान्य क्रमाने प्रवेश दिला जाईल.

(वरील सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती स्वतःजवळ ठेवाव्या, कार्यालयातून मागणी करू नये.)

 

महाराष्ट्र राज्य पुणे / नाशिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची १२ वी परीक्षेव्यतिरिक्त इतर परीक्षा (उदा. डी. एड., राज्याबाहेरील बारावी, इ.)  उत्तीर्ण  विद्यार्थ्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून पात्रता प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र अर्ज करून सोबत पुढील कागदपत्रे जमा करणे अनिवार्य आहे.

१) दहावीच्या गुणपत्रकाची फक्त एक झेरॉक्स प्रत.

२) बारावीचे मूळ गुणपत्रक + तीन अटेस्टेड झेरॉक्स प्रती.

३) बारावीची शाळा सोडल्याचा मूळ दाखला + तीन अटेस्टेड झेरॉक्स प्रती.

४) मूळ बोनाफाईड / कॅरेक्टर सर्टिफिकेट + दोन अटेस्टेड झेरॉक्स प्रती.

५) स्थलांतर (मायग्रेशन) प्रमाणपत्र + तीन अटेस्टेड झेरॉक्स प्रती.

६) प्रवेश घेताना भरावयाची संबंधित वर्गाच्या शुल्काची आवश्यक रक्कम.

७) विद्यापीठाने निर्धारित केलेले पात्रता शुल्क.